Blogger Templates

Translate in Your Language

Thursday, January 29, 2015

काहीतरी शिका यातून !

काहीतरी शिका यातून - / (आपले मत जरूर मांडा/Please Comment)

             मानवाच्या गेल्या ५००० वर्षाच्या इतिहासात संपूर्ण जगात कोठेहि संपूर्ण क्रांती झालेली नाहीये, एकही अपवाद नाही.
क्रांती नंतर प्रतिक्रांती होणे हे जणू एक जगाचं सूत्रच झालेलं आहे. क्रांतीचाच वापर करून प्रतिक्रांती जोरात होते, आणि त्याचे परिमाण म्हणून जगभर क्रांतिकारक चिरडले गेले आहेत.
यामागे मला मुख्य २ कारण दिसतात -

           १. मुख्य कारण,  क्रांती आजपर्यंत नेहमी क्रांतीकारकांकडून घडली, ती कधीही विद्रोही लोकांनी केली नाही.
क्रांतीकारकाला क्रांती होण्याशी मतलब असतो, क्रांती नंतर पुढे काय याची काहीही चाहूल क्रांतीकारकाला नसते, आणि म्हणूनच क्रांतिकारक क्रांती होऊन देखील अपयशी होतात.
आणि त्या पेक्षाही लक्ष देण्याची बाब अशी कि, क्रांतीकारकाला ज्याच्यासाठी क्रांती करतो आहे त्याला नेमकी याची गरज तरी आहे का ?  याच्याही काही घेण देन नसतं, त्याला क्रांतीशी अडलेलं असतं. कदाचित याचाच फायदा उचलून पुन्हा प्रतिक्रांती होते, आणि दर वेळेस प्रतिक्रांती पुन-पुन्हा येताना आधीच्या पेक्षा अधिक बळकट होऊन येते, आणि पुन्हा हेच चक्र वारंवार चालू राहते.
म्हणून आता आपल्याला आता अश्या क्रांतीची गरज आहे जिची परत प्रतिक्रांती होऊच शकत नाही. यातच एक मुद्दा असा कि, बर्याचदा क्रांती होताना क्रांतिकारक जेव्हा सत्तेवर जातात तेव्हा पुन्हा तेच क्रांतीला विरोध करतात, सत्तेवर आले कि ते सत्ता चालवत नाही तर सत्ता त्यांना चालविते.

            २. दुसरं म्हणजे, आजपर्यंत जगात जेथे कोठे क्रांती झाली असेल, ती प्रत्येक क्रांती समाजपरिवर्तनासाठी झाली, क्रांती करणारे लोक हे विसरूनच गेले कि जोपर्यंत व्यक्ती परिवर्तीत होऊ शकत नाही, तोपर्यंत संपूर्ण सामाजिक क्रांती शक्य नाहीये. व्यक्ती क्रांतीचे by-product म्हणून समाजात क्रांती होऊ शकते, परंतु सामाजिक क्रांतीने आजपर्यंत कधीही व्यक्ती परिवर्तीत केले नाही. म्हणूनच जगातील सर्व क्रांत्या अपयशी ठरल्या.
आज समाजाला व्यक्ती परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे, नाहीतर समाजाचा एक भाग इकडे तर दुसरा तिकडे असा जातो आहे, आणि संपूर्ण समाज खंडित झाला आहे. आजपर्यंत एकदाही अखंडित आणि सुसूत्रताबद्ध समाज स्थापित आपण करू शकलो नाही याची आपल्याला लाज वाटायला हवी.


व्यक्ती क्रांती हि सामाजिक क्रांती पेक्षा अधिक वेगाने झालेली आहे, होऊ शकते, म्हणून माझा आजही दिव्याने दिवा प्रज्वलित करण्यावर विश्वास आहे. जे कोणी लोक फक्त कुतर्क करायचा म्हणून व्यक्ती क्रांतीला विरोध करतात त्यांना काही म्हणण्या-न-म्हणण्याने काही उपयोग नाही, तिथे डोके फोडण्यात काही अर्थ नाही.
जरा या दृष्टीने देखील विचार करा, आणि एक विद्रोही व्यक्ती म्हणून जगा, क्रांतीकारक बनून समाजाला आणखी मोठ्या दरीत ढकलू नका. धन्यवाद..! आपले मत जरूर मांडा.

No comments:

Post a Comment

Labels