Blogger Templates

Translate in Your Language

Wednesday, January 28, 2015

मृत्युच्या दारातून परत (!)



कुणी यावर विश्वास ठेवो-न-ठेवो
कुणाच काय मत असेल माहित नाही
पण माझ्या आयुष्यातील हा एक अत्यंत आनंदाचा क्षण होता

दि – २४ ऑगस्ट, २०१४              वेळ – सायं. ४:३६

मृत्युच्या दारातून परत (!)
                 

ह्या  सगळ्याची  सुरुवात  आजपासून  साधारणत:  २  महिन्यांपूर्वी  झाली.  मला वेगवेगळ्या  विषयांवर  वाचायला,  ऐकायला,  चिंतन-मनन  करायला  आवडत.  तेव्हा  मी  नुकताच  १०  दिवसांचा  Meditation  course  करून  आलेलो  होतो.  आणि  ह्या  सर्वांतील  माझी  आवड  आणखीनच  वाढली  होती.
          मला  एक  विशिष्ठ  आणि  जरा  वेगळ्याच  music  बद्दल  माहिती  मिळाली. जे  खूप  प्राचीन  आहे. त्या  काळी  ते  प्रचंड  प्रसिद्ध  झालेलं  असाव, परंतू  त्यावर  लवकरच  जगभरात  बंदी  आणण्यात  आली.  कारण  एकच  होत  कि  ते  music  माणसाला  इतक्या  शांततेत  इतक्या  खोलवर  न्यायचं  कि  माणूस  तत्क्षणी  मारून  जायचा.  ऐकलं  तेव्हा  मला  फार  विचित्र  वाटलं.  पण  सोबतच  माझी  जिज्ञासाही  वाढली,  यावर  विश्वासच  बसेना  कि  असं  काही  असेल  म्हणून.  मग  मी  शोध  घ्यायला  सुरुवात  केली.  गेली  दोन  महिने  रोज  internet  वर  खूप  वेळ  त्याबद्दल  search  करायचो  पण  पूर्ण  internet  वर  मला  गेली  दोन  महिने  काहीच  मिळालं  नाही.  पण  माझ  शोधण्याच  काम  चालूच  होत.
          काल  रात्री  २:३०  च्या  दरम्यान  मला  एक  music  मिळालं.  Original  music  मधला  थोडासा  भाग  cut  करून  ते  बनविलेलं  होत.  पण  जवळपास  त्यासारखच.
          काल  रात्रभर  मला  झोप  लागली  नाही,  फक्त  त्याबद्दल  विचार  करत  होतो, कधी ते  ऐकेल  असं  झालं.
दिवस  आजचा -
          माझा  मृत्यूचा  दिवस (?)  आज  सकाळपासूनच  मनाची  पूर्ण  तयारी  केली  कि  काहीही  झालं  तरी  आता  ऐकायचंच.  दुपारी  room  मध्ये  एकटाच  होतो.  आधी  मनाची  तयारी  करण्यासाठी  मी  त्यापासून  बनविलेलं duplicate (११ मिनिट) ऐकायचं  ठरविलं, त्यात  मला  जास्त  काही  वाटलंच  नाही. आता  मन  घट्ट  केलं, ठरविलं  कि  आता  मेलो  तरी  चालेल  पण  हे  ऐकायचं.
          एक  भयानक  मूर्खपणा  मी  करत  होतो  हे  मला  माहित  होत  पण  मला  आता त्यापलीकडे  काही  सुचत  नव्हत.  मग  मरण्याच्या  पूर्ण  तयारीने  ते  music सुरु  केलं. Earphones घातलेले  होते, room  मधला  fan full केलेला  होता. (म्हटलं  गरमी मध्ये  का  म्हणून  मारायचं ?)
एकीकडे  मरणाची  भीती  होतीच  ( अजूनही !) म्हटलं  मरण  कसं  येत  याचा  अनुभव  तरी  घ्यावा  मग  संपूर्ण  शरीरावर concentrate केलं  आणि  काय  काय  जाणवत  याकडे  focus  होत  आणि  मनावर  पण  लक्ष  होत. Music सुरूच  होत. सुरुवातीला  मला  काहीच  विशेष  वाटलं  नाही.
असंच १०-१५ मिनिट  ने  माझ  शरीर  थंड  (अकंप)  व्हायला  लागल, मनात  विचारही  खूप  कमी  यायला  लागले, फक्त  एखादाच  विचार  यायचा  आणि  तोही  लवकरच  जायचा  आणखी  काही  वेळाने  मन  पूर्ण  विचारशून्य  व्हायला  लागले. मनाच्याही  पलीकडे  काही  असतं  असं  फक्त  ऐकलं  आणि  वाचलेलं  होतं  आता  अनुभव  यायला  लागला  होता. पण  ते  काय  होतं  हे  कळत  नव्हत.  असाच  वेळ  हळूहळू  जात  राहिला  काय  सुरु  आहे  काहीच  कळत  नव्हत.

          आणि....  आणि  अचानक  एक  प्रचंड  मोठा  आज  माझ्या  कानांमध्ये  आला.  खूप  मोठा..  मला  १५  मिनिट  काय  झालं  काहीच  कळत  नव्हत.  मग  मला  हळूहळू  कानात  वाजणाऱ्या  music  चा  आवाज  समजायला  लागला.  गेली  १५ मिनिट  काय  चालू  होत  काहीच  कळत  नव्हत.  झोपेतच laptop  वर time बघितला  आणि  एकदम  shock झालो. " एक  तास  झाला  होता."  माझा  विश्वासच  बसला  नाही  आणि  अजूनही  बसत  नाहीये.
          माझ  डोक  प्रचंड  दुखायला  लागलं  होत,  मला  ५  मिनिट  जागेवरून  हलताही  आलं  नाही  मग  मी  earphones  काढले  अजूनही  काहीच  कळत  नव्हत, पाणी  घेतलं  घटघटा  पूर्ण १ लिटरची  बाटली  फस्त  केली.
मग  आठविण्याचा  प्रयत्न  केला. गेला १ तास  काय  झालं  होत ? पहिल्यांदा  वाटलं  कि  मी  झोपेत  होतो, पण  असं  वाटलं  कि  मी १ तास  नाही  तर  कितीतरी  दिवस  कितीतरी   महिने  आणि  कदाचित  कितीतरी  वर्ष  पूर्ण  झोपेतच  होतो  कि  काय. इतकी  गाढ  झोप  मला  आजपर्यंत  संपूर्ण  आयुष्यात  कधीच  आली  नव्हती, ती  झोप  होती  यावरही  माझा  अजिबात  विश्वास  बसणार  नाही.  काहीच  कळत  नाहीये, काहीच  आठवत  नाहीये. मी  खूप  पलीकडे  कोठेतरी  अज्ञात  ठिकाणी  गेलो  होतो  असं  आता  वाटतंय. Gallery मधून  बाहेर  बघितलं  तर  सगळ  जगच  वेगळ  दिसायला  लागलं  होत. हिरवीगार  झाड,  रंगबेरंगी  फुल, असिमित  आकाश, पक्षांचा  किलबिलाट  मला  पहिल्यांदाच  इतक्या  वेगळ्या  पद्धतीने  जाणवायला  लागला  होता.  आता  मनात  लहानपणापासून  तर  आतापर्यंतच्या  सर्व  परिचितांची  आठवण  यायला  लागली. सर्वांना  हा  अनुभव  सांगावा  वाटत  होता.  इतका  प्रचंड  आनंद  होत  होता  कि  तो  शब्दांमध्ये  सांगणसुद्धा  फार  अवघड.
          तो  एक  तास  काय  झालं  काहीच  म्हणजे  काहीच  माहिती  नाहीये, पण  त्याने  माझ  पूर्ण  मन, माझ  पूर्ण  अस्तित्वच  बदलून  टाकल  कि  काय  असं  वाटायला  लागलं.  मनामध्ये  सर्वांबद्दल  प्रचंड  करुणा,  प्रेम  दाटून  यायला  लागलं.
मी  काय  कोणता  मोठा  पराक्रम  केलेला  आहे  असं  अजिबात  नाही, कुणाच्या  नजरेतून  हे  काहीही  असो,  मग  याला  कोणी  विक्षिप्तपणा  म्हणो, अथवा  वेडेपणा  किंवा  सरळ  मूर्खपणा  म्हणो. माझ्यासाठी  हा  एक  प्रचंड  सुखद  अनुभव  होता.  असं  वाटायला  लागल  कि  ज्याला  मी... मी  समजत  होतो  तो  मी  नाहीच. पहिल्यांदा  मला  माझी  माझ्याशी  ओळख  झाल्यासारखं  वाटत  होत.  इतका  आनंद  होत  होता  कि  सर्वांशी  वाटावा  वाटत  होता.  हा  अनुभव  मी  आयुष्यभर  (मरेपर्यंत !)  कधीच  विसरू  शकणार  नाही.  शेवटी  एक  मात्र  प्रकर्षाने  जाणवलं  अखेर  जिवनाच  अंतिम  सत्य  मृत्यू  हेच  आहे, आणि  मी त्याला  बेधडकपणे (थोडा भीत-भीतच !) सामोर  गेलो.  मी  असही  म्हणणार  नाही  कि  तो  मृत्यू  होता  अन  मी  मरून  परत  जिवंत  झालो.  तसं  म्हणन  एक  ढोबळ  मूर्खपणा  ठरेल.  पण  ते  काहीही  असो  शब्दांत  न  सांगण्यासारख  होत.
          कदाचित  हा  माझा  भ्रमही  असू  शकेल, पण  जाग  आल्यावर  मला  जीवनाची  किंमत  आणखी  कळायला  लागली. माझी  सर्व  मित्रांना, प्रियजनांना  एकच  विनंती राहील, आयुष्य  खरच  फार  मौल्यवान  आणि  खरच  फार  सुंदर  आहे.  ते  "जगा".  इतकं  हसत  खेळत  जागा  कि तुम्हाला  वाटलं  पाहिजे  कि  जगातील  सर्वात  आनंदी  तुम्हीच  आहात.  जीवन  फार  मौल्यवान  आहे  त्याला  इतरांची  निंदा  करण्यात,  इर्षा  करण्यात,  jealousy मध्ये,  रडत-रडत  जगण्यात  वाया  घालवू  नका.  त्याला  प्रचंड  आनंदाने,  प्रेमाने, करुणेने  भरून  काढा.  आणि  माझा  विश्वास  आहे  तुम्ही  हे  करणार...
 नक्कीच  आता  यापुढे  जगणार...  खर्या  अर्थाने  जगणार...!!

ते  काहीही  असो,  त्यानंतर  मला ३-४  तास  काहीच  बोलता  येत  नव्हत  एव्हड  मात्र  खर...!  आणि  एकदा  चक्करही  (ग्लानी)  आली  होती.
          I don't believe on being Happy, I believe on Staying Happy. There is a huge difference.

प्रतिक्रिया  देन  हे  जिवंत  माणसाच  लक्षण  आहे. तुमच्या  सर्व  प्रकारच्या  प्रतिक्रियांची मी   आवर्जून  वाट  बघतोय.



                    - Suyog Kalpana Balasaheb Naikwade

1 comment:

Labels