Blogger Templates

Translate in Your Language

Friday, January 30, 2015

नको, गनिमी कावा नकोच !

             नको, गनिमी कावा नकोच !

काल परवा पेपरला बातमी वाचली, घटना बघितली, अनेक प्रतिक्रिया मनात आल्या, काय झाल ? का झालं ? काय कारण ? खरच हेच कारण असाव का ? असे अनेक विचार मनात आले. एक मित्राकडून video पण बघायला मिळाले, मन फार कळवळून आले. अन खूप दिवसानंतर हातात पुन्हा लेखणीचे शस्त्र घ्यावे वाटले.
          होय मी लातूरला झालेल्यागनिमी काव्याबद्दलबोलतोय. आज महाराज असते तर.....? ह्या असल्या भानगडीत मला पडायचे नाहीये, पण आज तथाकथित गनिमी काव्यावाले माझासमोर आले असते तर नक्कीच मी त्यांच्या कानाखाली लावली असती. इथे महाराजांचा शिव-कावा (गनिमी कावा) आणि ह्या अक्कलशुन्यांनी घेतलेला त्याचा तथाकथित अर्थ याच्याशी सध्या तरी मला तटस्थ राहायचे आहे, त्यावर अनेक जन बोलले आहेत, अनेक विचारवंतांनी आपली अक्कल त्यासाठी पाजळली आहे, मीपण ते करण्यात वेळ वाया घालविणार नाही. थोडक्यात इतकंच कि महाराजांच्या युद्धतंत्राचा समाजसुधारणेचा ठेका घेतलेल्यांनी चुकीचा अर्थ काढला हे नक्कीच आहे, एव्हडेच नव्हे तर त्यांचा शिवाजी महाराजांबद्दल किंचितही अभ्यास नाही हे तर स्पष्टच आहे.
          मला वाटतं, ह्या सगळ्या प्रकारात त्या दोन्हीही गटांची अजिबात चूक नाहीये, चूक आहे ती आपल्या समाजव्यवस्थेची, सगळीकडे गनिमी काव्याच्या त्या मुलांना नाव ठेवलं जात आहे, त्यांना दोषी ठरविलं जात आहे, पण मला थोडीशी त्या मुलांची (मुर्खांची) बाजू घ्यावी वाटते. त्यांनी केलेल्या कृत्याच्या मी अजिबात समर्थनार्थ नाहीये, अजिबात नाही, पण तरीही मी जराशी त्यांची बाजू घेऊ इच्छितो. मी बोलतोय त्याबद्दल गैरसमज होऊ शकतो म्हणून मी आधी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो
स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्याच पहायचं वाकूनअसली सवय असलेला भारत हा सर्वात अग्रेसर देश आहे, आणि आपले सगळे समाजसुधारक (!) तथाकथित क्रांतिकारक (?) फक्त आम्हीच तेव्हडे परिवर्तनवादी म्हणविणारे स्वयंघोषित भारतमातेचे पुत्र (!) असे सर्वच्या सर्व या प्रकारात मोडतात, हे सर्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, लातूरला एक बाजू उघडी झाली म्हणून वावगे वाटू देऊ नका, लवकरच दुसरी बाजूदेखील वर येईल. मला वाटतं ह्या घटनेच्या पूर्ण मुळाशी गेल्याशिवाय आपल्याला अशी विकृती उपटून काढता येणार नाही, खरंतर का व्हाव असं ? स्पष्टच बोलायचं झाल तर मानसिक विकृती (mental disorder) यापेक्षा वेगळ काही नाही.
मुल वयात यायला लागली कि समाजात घाण करणारे सर्वच्या सर्व (एकही अपवाद वगळता) सामाजिक (?) संघटना डोके वर काढायला लागतात, या वयातील मुलांमध्ये आपसूकच नवीन उर्जा फुलत असते, मग यांना समाजाचे थोडेसे डोस पाजून, समाजसुधारणा, देशपरीवर्तन, महामानवांना अपेक्षित समाज (!) निर्माण करण्याचा ठेका घेतलेले सर्वच्या सर्व संघटना एकाच वेळेस डोके वर काढायला लागतात, मग जो-तो आपल्या कुवतीनुसार ज्या-त्या मुर्खासोबत आपला ताळमेळ बसवून घेतो, आणि मग हा सगळा खेळ सुरु होतो. गेल्या ५००० वर्षात आपण जगभरात १५,००० युद्धे केलेली आहेत, त्यात छोटीमोठी तर सोडलीच. एव्हडच नव्हे तर आपण संपूर्ण जगालाच दोन महायुद्धांत ढकलले, आणि आता निर्लज्जपणे तिसर्याची वाट बघतो आहे.
लातूरला गनिमी काव्यात कामी आलेले निकामीच अश्या घटनांसाठी कारणीभूत ठरतात, पण हे फक्त दृश्य स्वरूप आहे, यामागे मूळ कारण आहे तो आपला सामाजिकढाचा’, समाजव्यवस्था. गेली ५००० वर्षे आपण तोच-तोच कचरा वाहत चाललो आहे. त्यातून प्रचंड दुर्घंद येत आहे, त्यात महामारी झाली आहे, कितीही किडे पडले आहेत, तरी आपण अजूनही त्याला डोक्यावर घेतच आहोत, कारण का तर कचरा आपला आहे ! जोपर्यंत आपण सर्वच समाजव्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत अश्या घटना घडतच राहणार. आजपर्यंत जगाचे जे काही नुकसान झाले आहे ते फक्त समूहाने, गर्दीने, कळपाने केलेले आहे, म्हणून जोपर्यंत समाजात गर्दी, कळप असतील तोपर्यंत अशा घटना आता वाढतच जाणार आहेत. हे फक्त trailor होत, असली picture तो अभी बाकी है |
आपल्या प्रत्येकालाच आपली हि मानसिकता बदलावी लागेल, का म्हणून आपण इतरांच्या personal fare मध्ये interfare करायचं ? कोणी आपल्याला तो हक्क दिला आहे ? आपण आपले बघावे एव्हडच. मी तर म्हणेल, तुमच्या life चे सगळे problems clear झाले का ? कि तुम्ही इतरांचे solve करायला निघालेत ? तुम्ही काय ठेका घेतला आहे का ? किती विकृत मानसिकता आहे हि ! आपण कुणाला त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्यहि देऊ शकत नाही ? आणि आपणही स्वतंत्र राहू शकत नाही ? कोणताही समाज जोपर्यंत संपूर्णतः व्यक्तिस्वतंत्र होत नाही. तोपर्यंत त्या समाजाची मानसिक प्रगती होऊच शकत नाही. चीनमध्ये एक कथा प्रसिद्ध आहे, लाऊत्झो नावाचा विचारक हा जन्मता: म्हातारा होता, तो म्हाताराच जन्माला आला. मला ती कथा खरी वाटते, कारण मी भारतीय समाजाकडे बघितलं तर मला वाटत हे वचन खर आहे. इथे प्रत्येक भारतीय जन्माला येताना म्हातारा म्हणूनच जन्माला येतो कि काय असं वाटत. इथे वर्षाच्या मुलाची वैचारिक बुद्धीची तुलना केली तर ती अक्षरशः ६५ वर्षाच्या म्हतार्यापेक्षा अधिक आहे. बुद्धीचा वापर करणे जणू आपल्या कायद्यातच नाही कि काय अशी अवस्था आहे. वस्तू किंवा एखाद खाद्यपदार्थ जितकं जुनं होत जात. तितकं ते सडत जात, तितकं ते घाण होत जात. तितकी त्यातली पौष्टिकता कमी होत जाते. त्यातले जीवनसत्व कमी होतातच, अन त्यात किडे पडायला लागतात. आपल्या समाजात देखील असे अनेक किडे पडले आहेत, पण तरीही आपण आजदेखील फक्त जुनं-जुनं आहे म्हणून त्याला डोक्यावर मिरवत आहोत.
जीवन हा प्रवाह आहे, थांबल कि डबकच तयार होत. आपला समाज गेली कित्येक शतके डबक्यात आहे, त्या डबक्यात गनिमी काव्यासारखे लाखो किडे वळवळत आहेत. स्त्री-मुक्तीचा ठेका घेतलेली अपर्णा रामतीर्थकर असो, कि घरोघरी भांडणे लावणारी एकता कपूर असो, घरोघरी चार-चार, दहा-दहा पोरं जन्माला घालून आणखी कचरा निर्माण करायला प्रवृत्त करणारे धर्मगुरू (!) असो हे सर्व एकाच समाजव्यवस्थेचे वेगवेगळे पैलू आहेत, मुलतः हे आतून एकाच मनोवृत्तीचे आहेत, अन बाहेरून फक्त मुखवटे पांघरलेली आहेत. अन जोपर्यंत आपण यांचे मुखवटे फाडून त्यातली असली मनोवृत्ती बदलत नाहीत तोपर्यंत भारतीय समाजाचे वाटोळे ठरलेलेच आहे.
          मुलतः हि घटना झाली ती फक्त आणि फक्त दुसर्याच्या ताटात डोकून बघायच्या घाण सवयीमुळे. कोणी दिला आहे तुम्हाला अधिकार दुसऱ्याच्या personal matter मध्ये डोकावण्याचा ? तुम्हीच काय तेव्हडे समाजसुधारक का ? मी तर याहीपुढे जाऊन म्हणेल, रस्त्याने कोणी किंवा बागेत किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जर कोणी प्रेमी युगुल एकमेकांचे चुंबन घेत असले तरी काय हरकत आहे ? एव्हडच नाही तर, कुणी कुणासोबत प्रणयात रममाण व्हायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि खाजगी प्रश्न आहे. आपणाला मध्ये यायचा काही एक हक्क नाही, अधिकार नाही. आपण त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. ते प्रेमामध्ये आकंठ आहेत. त्यांनी तुम्हाला कसला त्रास दिला आणि त्यांनी तुमच्याशी काही समंध ठेवला आहे. मग तुम्ही कोण लागून जाता त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत डोकं घालणारे. मुलतः हि असली प्रवृत्ती म्हणजे मानसिक आजार आहे, it’s a psychological disease. पण आपल्याकडे सर्वांना हा आजार झाला असल्या कारणाने कुणीच लक्षात घेत नाही. आपण सर्वच या आजाराला बळी पडलेलो आहोत.
          एकीकडे आपण घसा फाटेपर्यंत बोंबलत राहायचे jesus ने शिकवण दिली, God is Love. मग प्रेमी म्हणजे देवदूतच झाले नां ? मग तुम्ही देवदूतांना विरोध करता ? लाज कशी वाटत नाही ? आपण तर एकीकडे म्हणतो जगात कोणतीच गोष्ट वाईट नाहीये, ज्या परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं तो वाईट गोष्ट निर्माण करूच कशी शकेल, म्हणून तर आपण  कामाला (sex)  देखील अत्यंत पवित्र म्हटले आहे. प्रतिक म्हणून आपण देवही तयार केला आहे, ज्याला नाव दिलं कामदेव. म्हणजेच काय तर काम (sex) सुद्धा देव आहे.  जर काम देव आहे तर मग देवाला का विरोध ? प्रेमाला तर नकोच नको, कामाला सुद्धा नको. इसिलीये तो कहते है ना, काम हि राम बनता है | जर देवाने मला निर्माण केले असेल, तर मी केलेल्या सर्व चुकांना जबाबदार देवच आहे. जी काही चूक माझ्या हातून होईल त्याचा मुख्य सूत्रधार तर तोच राहील, कर्ता-करविता तोच असेल मग मी का चिंता करू ? आणि याहीपेक्षा इतरांनी का चिंता करावी माझ्या आयुष्याची, त्यांनी त्याचं बघावं, आणि तेव्हड बघितलं तरी खूप झाल. म्हणून तर देव मुल जन्माला घातलाना एकट्यालाच घालतो. या जगात जे काही निर्माण होत ते एकट आणि स्वतंत्र निर्माण होत. अस्तित्वाला यातून इतकंच सांगायचं असतं कि, तू आलाही एकटा आहेस, आणि तू जाणारही एकटा आहेस. तू फक्त तुझ कर्तव्य साध्य कर, तू तुझाच शोध घे, फक्त तुझाच हो, आणि ज्या दिवशी तू खरोखरच तुझा होशील त्या दिवशी हे संपूर्ण अस्तित्व तुझ होऊन जाईल, आणि तुही या अस्तित्वाचा होऊन जाशील. थेंब सागरात विलीन होऊन जाईल.
या सर्व गोष्टी कशा थांबवायच्या ? कुणी थांबवायच्या या सर्व भानगडीत तुम्ही पडूच नका, मला वाटत तुम्ही फक्त तुमचंच वैयक्तिक स्वतंत्र बघा. इतरांना त्रास होऊ देता, आणि तेव्हडच खूप झाल. तुमच्यावर फक्त तुमची स्वतःची जबाबदारी आहे. तेव्हडिच फक्त निभावली तरी परमात्मा तुम्हाला धन्यवाद देईल. हे एक निर्विवाद सत्य आहे. काही गरज नाही, समाज सुधारण्याचा तथाकथित ठेका घेण्याची, काही गरज नाही स्वतःला परिवर्तनवादी म्हणवून घेण्याची. क्रांतीकरण खूप झालेत, आणि प्रत्येक क्रांतीकारकाने जगाचं फक्त नुकसानच केलं आहे. तुम्ही फक्त स्वतः एक विद्रोही म्हणून जगलात तरी खूप झाले. धर्माचे ठेकेदार आणि परिवर्तनाचे तथाकथित ठेकेदार हे दोन्ही या एकाच नाण्याच्या बाजू आहेत, आणि हेच एकमेव सत्य आहे. समाज बदलण्याच खूळ डोक्यातून काढून टाका. समाज कधी बदलाल होता आणि कधी बदलेल. ‘बदलतात ते व्यक्ती.’ आणि हि totally individual process आहे. प्रक्रिया आहे. तुम्ही फक्त स्वतःला बदलत राहा, vast होत राहा. वैश्विक होत राहा, त्यातच जीवनाचा सार आहे.
          याला कोठेही अन्यथा नाहीये, नाहीतर हे सगळे प्रकार पुढेही चालूच राहणार, आणि आपण आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहे, एकतर आपल्यालाबदलनाहीतरमरणदोन्हीपैकी एक समोर आहे. आताच सावध व्हा आणि स्वतःला फक्त स्वतःला बदला, फक्त स्वतःचे व्हा.

                                                                                      २४//२०१५
                                                                             सुयोग नाईकवाडे



Labels