Blogger Templates

Translate in Your Language

Wrong Definition

What is exactly Wrong Definition ?
काय आहे नेमकी चुकीची वाख्या ?

        साधारणतः वरवर बघितले तर वाटेल कि जर आधीच वाख्या चुकीची आहे तर मग ते काय आहे ते जाणण्यात काही अर्थही नाही ना ?
परंतु मला असे वाटते, आपण ज्याला बरोबर म्हणून डोक्यावर मिरवितो त्यापेक्षा चुकीच्या व्याख्येतच खूप काही आहे. अगर ठीक से देखा जाये तो जगत मै न कुछ सही है, और नाही कुछ गलत, सही और गलत तो देखनेकी दृष्टी है | 
         पण मला जाणूनबुजून माझ्या या blog ला Wrong Definition हे नाव द्यावे वाटले, त्यामागे खूप वेगवेगळी कारणे आहेत. प्रथमतः वाचकाच्या दृष्टीने बघायचे झाल्यास कोणताही वाचक असो, त्याला या blog वरील कितीतरी content (लेख) अत्यंत चुकीचे वाटतील. म्हणून मला वाचकांना आधीच सांगायचे आहे कि इथला कोणताही लेख तुम्हाला वरवर बघता बरोबर वाटणार नाही, आणि मी मी जगात जेव्हड्या प्रकारचे लोक असतील त्या सर्वांना चुकीचा वाटेल अश्या प्रकारचे लेख लिहायला फार आवडेल. विषय चूक किंवा बरोबरच नाहीच, मुळत: तुम्ही चूक किंवा बरोबर कशाला ठरविता ? तर जी गोष्ट तुमचा पूर्वग्रह, तुमचं पूर्वज्ञानाशी तुम्हाला मिळतीजुळती वाटते, त्याला तुम्ही चुकीची म्हणता. म्हणजेच थोडक्यात काय तर, जी गोष्ट तुमचा अहंकार अहंकार वाढविते, त्याला तुम्ही चांगले म्हणता, आणि जी तसं करत नाही, त्याला तुम्ही चुकीचं म्हणणार. साहजिकच मला कोणाचाही अहंकार वाढविण्यामध्ये काहीएक interest नाहीये. म्हणूनच इथे प्रत्येक वाचकाला या blog वर मिळणारे लेख हे त्याच्या त्याच्या विचारसरणीच्या विरूद्धच वाटतील, आणि अनेक लेख त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाच्या दृष्टीने सोयीस्कर देखील वाटतील.

No comments:

Post a Comment

Labels